ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चित्रपट निर्माते अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना कोठडी

पुणे, दि. १७ - चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांचा मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्यांची पत्नी प्रियंकासह चौघांना अटक केली आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयात आणले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रियंका अतुल तापकीर (वय ३२, रा. गणेश नगर, पिंपळे निलख), कल्याण रामदास गव्हाणे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द), बापु किसन थिगळे (वय ३७, रा. थिगळे स्थळ, राजगुरूनगर), प्रसाद ऊर्फ बाळु रामदास गव्हाणे (वय ४८, रा. कोंढवा खुर्द) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी अतुल यांचे वडील बाजीराव नामदेव तापकीर (वय ५९) यांनी फिर्याद दिली आहे.

 २००७  रोजी प्रियंका हिचा अतुल तापकीर याच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर प्रियंकाने घरच्यांपासून वेगळे राहण्यासाठी  अतुलकडे तगादा लावला होता. यादरम्यान अतुल यांनी ढोल ताशे या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्याने चित्रपटाच्या निर्मितीसाठी केलेला खर्चामुळे कर्जबाजारी झाले होते. कर्जबारीपणामुळे त्यांची पत्नी प्रियंका तपकीर हीने अतुल यांचा आणखी छळ सुरू केला होता.

प्रियंका ही तिच्या माहेरी असताना तिने अतुल विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पत्नीकडून मानसिक   शारिरीक त्रासाला कंटाळून १४ मे रोजी रात्री फेसबुकवर पोस्ट लिहून अतुल तापकिर यांनी हॉटेल प्रेसिंडेंट मध्ये वीष घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचे अन्य कोणी साथीदार आहेत का?, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला आहे तसेच गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने सरकारी वकीलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.