ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आंदेकर टोळीचा कुख्यात गुंड राहुल खेत्रेला पोलिसांच्या बेड्या

पुणे, दि. १८ - आंदेकर टोळीचा नाना पेठेतील कुख्यात गुंड राहुल खेत्रे याला बेड्या ठोकण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. खेत्रे याला पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल (मंगळवारी) अटक केली. गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, खेत्रे हा पुणे शहराच्या हद्दीमध्ये दिसला होता. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. नंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशनुसार, शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झोन दोनच्या उपायुक्तांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५५  नुसार खेत्रे याला पुणे शहरातून तडीपार केले होते. पुण्यातील कुख्यात अशा आंदेकर टोळीचा खेत्रे हा सदस्य आहे.

पुण्यातील विविध व्यावसायिकांना, सामान्य नागरिकांना आणि इतर व्यक्तींना टार्गेट करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे काम ही टोळी करीत असते. ही टोळी नाना पेठेतील डोके तालीम, मच्छी मार्केट, धान्य बाजार, पालखी विठोबा चौक, ओसवाल पंचायत, मिठापल्ली वाईन शॉप या भागात सर्वाधिक सक्रीय आहे. भवानी पेठेतील काही भागांतही या गँगची दहशत आहे. कायदा पाळणारे आणि सरळ मार्गाने चालणाऱ्या सामान्य नागरिकांना वेठीस धरून त्यांच्यामध्ये दहशत करण्यासाठी ही टोळी कुप्रसिद्ध आहे.

खेत्रे हा या टोळीचा सदस्य Posted On: 18 May 2017