ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टॉप टेन स्वच्छ स्टेशनमध्ये पुणे रेल्वे स्टेशन

पुणे, दि. १८ - स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल नव्या बदलाच्या वाऱ्यांनी बदलून गेलेल्या पुण्याने टाकले असून स्वच्छतेच्या बाबतीत राज्यासह भारतातील अनेक प्रमुख शहरांना जोडणारे पुणे रेल्वे स्टेशन हे देशातीलटॉप टेनस्टेशनांपैकी एक शहर ठरले आहे. विशाखापट्टणम स्टेशनने टॉप टेन स्टेशनांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर, पुणे नवव्या क्रमांकावर आहे. यासोबतच विभागात महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बडनेरा या स्टेशनांचाही समावेश असून ही स्टेशन अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

पुण्याचा गेल्या वर्षी करण्यात आलेल्या सर्व्हेत क्रमांक ७५ होता. पण केवळ एकाच वर्षात जोरदार मुसंडी मारत पुणे ७५ क्रमांकावरून थेट व्या क्रमांकावर पोहोचले आहे. देशात प्रचंड प्रमाणात नागरीकरण होत असून, शहरांतील लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. शिक्षणाच्या बाबतीत पुणे हे राज्यात अग्रेसर आहे. तसेच, पुण्याला असलेला वारसाही मोठा ऐतिहासिक असल्यामुळे देशभरातून आणि जगभरातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे. प्रचंड ताण असूनही पुणे स्टेशन हे स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांकामध्ये असने ही प्रत्येक पुणेकरासाठी अभिमानाची बाब आहे.

देशातील सर्व रेल्वे स्टेशनचे आयआरसीटीसीकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४०७ स्टेशनमधून टॉप टेन रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली असल्याचे भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तसेच, या यादीतही विभाग वन आणि अशी विभागणी करण्यात आली असून, त्यातील वन या विभागात पहिल्या दहामध्ये विशाखापट्टणम, सिकंदराबाद, जम्मू तवी, विजयवाडा, आनंद विहार टर्मिनल, लखनऊ अहमदाबाद, जयपूर, पुणे आणि बंगळूरू यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतील वांद्रे १५ व्या क्रमांकावर आहे.

दुसऱ्या बाजूला विभागात बियास, खम्माम, अहमदनगर, दुर्गापूर, मंचेरीयल, बडनेरा, रंगिया, वर्णागळ, दामोह आणि भूज हे टॉप टेनमध्ये आहेत. तर, लोणावळा २९ व्या तर सोलापूर १५ व्या क्रमांकावर आहे. अस्वच्छ स्टेशनांच्या यादीत दरभंगा भोपाळ आणि अंबाला कॅंट सर्वात आघाडीवर आहेत.