ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विशेष कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार

पुणे, दि. १८ - नयना पुजारी अपहरण, बलात्कार हत्या या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना प्रकरणाची उकल करणे, आरोपींना शिक्षा सुनावेपर्यंत पुरावे सादर करणे अशी कौतुकास्पद कारवाई करणा-या पोलीस अधिकारी कर्मचा-यांचा आज (गुरुवारी) पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुणे पोलीस आयुक्तालयात हा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी सर्व प्रथम सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अशोक कदम, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय हेमाडे, पुणे पोलीस स्टेशन येरवाडाचे कर्मचारी प्रकाश लंघे, सुनील कुलकर्णी, सचिन कदम, प्रदीप शेलार, सुधीर चिकणे आदींचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला

आरोपींना अटक करणे, पुरावे गोळा करणे, तपास करून कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, दोळारोप पत्र दाखल करणे, आरोपींच्या जामीनास विरोध करणे, जामीन रद्द करणे, प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पाठपुरावा करणे अशी कामगिरी करणा-या कर्मचा-यांचा अधिका-यांचा प्रशस्तीपत्रक देऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सत्कार करण्यात आला.