ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पालखी रथ दुरुस्तीसाठी लष्कराच्या कार्यशाळेत दाखल

खडकी, दि. १८ - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील पालखी रथ दुरुस्तीसाठी खडकी येथील लष्कराच्या ५१२ या कार्यशाळेत बुधवारी पाठविण्यात आला.

संत तुकोबारायांचा ३३२ पालखी सोहळा महिना भरावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने सोहळयातील कामांची लगबग सुरू झाली आहे. पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाच्या दुरुस्तीसाठी हा रथ सालाबाद प्रमाणे खडकी येथील लष्कराच्या ५१२ या कार्यशाळेत बुधवारी पाठविण्यात आला.

पालखी रथ ओढणार्या बैलजोडींना रथाचा भार कमी व्हावा, कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रथात अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. रथाच्या चाकांतील दुरूस्ती तसेच अत्याधुनिक डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत दिवे, जनरेटर, वायरिंग आदी विविध कामांच्या दुरूस्तीसाठी पालखी रथ खडकीतील ५१२ या कार्यशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख अभिजीत महाराज मोरे आणि अशोक महाराज मोरे यांनी दिली.