ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पालकमंत्र्यांच्या फोटोला दारुच्या बाटल्यांची माळ घालून शिवसेनेचे आंदोलन

पुणे, दि. १९  -  सर्वोच्च न्यायालायने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५००  मीटरच्या परिसरात दारू विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले आहेतहे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. या घडामोडीच्या मागे पालकमंत्री गिरीश बापट हे असून कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरात हे रस्ते येता कामा नये. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पुणे महापालिकेत भजन करीत आणि पालकमंत्र्याच्या फोटोला दारुच्या बाटल्यांची माळ घालून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाविषयी शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, पुणे शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग महापालिकेत समावेश करण्याच्या घडामोडी घडताना दिसत आहे. हे रस्ते महापालिकेत घेण्याबाबत कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसत आहे. या सर्वांमागे पालकमंत्री असून हे रस्ते महापालिकेत आल्यास त्यांच्या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.