ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

प्रेमप्रकरणाच्या रागातून प्रियकराची गाडी व लग्नाचा मांडव जाळले

पुणे, दि. १९ – कात्रज येथील शनिनगर भागात प्रेम प्रकरणाच्या रागातून प्रियकराची गाडी त्याच्या लग्नाचा मांडव जाळल्या प्रकरणी एका महिलेला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा तपास करताना प्रेमप्रकरणाच्या रागातून ही घटना घडल्याचे तपासात उघड झाले आहे.  सुषमा गणपत टेमघरे  (वय ३६, रा. शनिनगर), असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिसांकडे काल (बुधवार) शनिनगर भागात एक दुचाकी गाडी, एक रिक्षा लग्नासाठी घरासमोर घातलेला मांडव जाळण्याच्या घटनेचा गुन्हा दाखल होता. या घटनेचा तपास करत असताना हा जळीत प्रकार एका महिलेने केला असून ती दत्तनगर येथील डी मार्ट येथून पळून जाण्याच्या तयारीत आहे. तिच्या अंगावर तिने निळ्या रंगाचा कुडता, गुलाबी रंगाची सलवार घातली आहे, अशी माहिती खब-यांमार्फत पोलीस कर्मचा-यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला पोलीस कर्मचा-यांच्या मदतीने महिलेला सापळा रचून अटक केली. जळीत प्रकरणाविषयी तिची चौकशी केली असता दीपक हरिभाऊ रेणुसे (रा. शनिनगर) याच्याशी आपले प्रेम संबंध होते. परंतु त्याने  लग्नास नकार देऊन दुस-या मुलीसोबत लग्न करत असल्याने त्याचा राग मनात धरून एक दिवशी रात्री त्याची गाडी जाळली दोन दिवसांनी त्याच्या लग्नाच्या मांडवावर रॉकेलचे पेटते बोळे टाकले, असल्याची कबुली दिली.