ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हरवलेल्या वस्तूंसाठी पुणे पोलिसांचे लॉस्ट अॅण्ड फाऊं पोर्टल सुरू

पुणे, दि. २० - नागरिकांना आता आपल्या हरवलेल्या वस्तूंची तक्रार थेड ऑनलाईन करता येणार आहे. त्यासाठी पोलीस ठाणे गाठण्याची गरज पडणार नाही. कारण कोणत्याही कारणास्तव हरविलेल्या वस्तूंची तक्रार नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांच्या वेबसाईटवरलॉस्ट अँड फाउंडनावाचे ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. विशेष म्हणजे डिजिटल सिग्नेचरद्वारे तक्रारीची प्रतही ऑनलाईन मिळणार आहे, अशी माहिती आर्थिक सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके उपस्थित होत्या.

नागरिकांना मोबाईल फोन, सिमकार्ड अथवा विविध कागदपत्रे हरवल्यानंतर याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात सतत चकरा मारून तासनतास वाट पहावी लागते. त्यामुळे अनेक वेळा नागरिक अशा वस्तूंची तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करतात. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या साधारण १०० ते १२० तक्रारी दाखल होतात. नागरिकांची गैरसोय अशा घटनांची संख्या पाहता याची ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि गुन्हे शाखेने पुणे पोलिसांच्या वेबसाईटवरलॉस्ट ॅण्ड फाऊंडहे वेबपोर्टल सुरू केले आहे. मंगळवारपासून हे पोर्टल सुरू होणार आहे. नागरिक या ठिकाणी हरवलेल्या वस्तूंची तक्रार देऊ शकतात.

पुणे पोलिसांच्या पुणे पोलीस डॉट को डॉट इन या वेबसाईटवरलॉस्ट अॅण्ड फाऊंडअशी लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर ओटीपी क्रमांक येईल. ओटीपी क्रमांक टाकल्यावर पेज उघडेल. त्यामध्ये हरवलेली वस्तू, कागदपत्रे, यांचा प्रकार स्वत:चे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आदीची माहिती भरावी लागेल. त्यानंतर ही माहिती संबंधित पोलीस ठाणे, गुन्हे शाखेला ऑनलाईन प्राप्त होईल. त्यानंतर उपायुक्तांची डिजिटल सिग्नेचर असलेली तक्रारीची प्रत नागरिकांना मिळेल.  

ती प्रत नागरिक हरवलेली वस्तू नवीन वस्तू घेण्यासाठी वापरू शकतील. तक्रार दिल्यानंतर वस्तू अथवा कागदपत्र सापडल्यास तक्रारदार याबाबतची Posted On: 20 May 2017