ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कामात हलगर्जीपणामुळे क्वालिटी कंट्रोलर अनंत वाघमारे निलंबित

पुणे, दि. २२ - मागवलेले स्पेअर पार्ट पीएमपीएमएल बसेसच्या इंजिनला बसल्याने हलगर्जीपणाचे कारण देत पीएमपीएमएलचे दर्जा नियंत्रक (क्वालिटी कंट्रोलर) अनंत वाघमारे यांना प्रशासनाने निलंबित केले आहे.

पीएमपीएमएल बसच्या इंजिन गिअर बॉक्सला जोडणा-या इनपुट शाफ्ट या स्पेअर पार्टची तपासणी करून तो योग्य असल्याचा शेरा अनंत वाघमारे यांनी दिला होता. मात्र हे इनपुट शाफ्ट बसेसच्या इंजिनला बसलेच नाहीत. त्यामुळे हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पीएमपीएमएल प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

यापुर्वीही, पीएमपीएमएलच्या प्रथम श्रेणीच्या वाहतूक व्यवस्थापकपदी असलेले अनंत वाघमारे यांची पदोन्नती बेकायदेशीर असल्याचे उघकीस आल्यानंतर अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी २१ एप्रिल रोजी त्यांची रवानगी थेट तृतीय श्रेणीच्या पदावर केली होती. आता तर त्यांनी मागवलेला स्पेअर पार्ट इंजिनला बसला नाही म्हणून त्यांना निलंबितच केले आहे.