ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पीएमपीची अर्थव्यवस्था प्रवासी केंद्रीत असायला हवी - शिरोळे

पुणे, दि. २२ - पीएमपी अधिक सक्षम करण्यासाठी पीएमपीतील समस्येच्या मूळापर्यंत जायला हवे. पीएमपीकरीता मिळणा-या पैशांची तरतूद योग्य पद्धतीने व्हायला हवी. पुढील वर्षाच्या दृष्टीने विचार करताना पीएमपीची अर्थव्यवस्था ही प्रवासी केंद्रीत असायला हवी. त्यामुळे पुढील एक वर्षात या दृष्टीने पीएमपीच्या सुधारणेसाठी चांगल्या पद्धतीने काम करण्यात येईल, असे प्रतिपादन पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी केले 

पीएमपी प्रवासी मंचातर्फे नवी पेठेतील इंद्रधनुष्य सभागृह येथे आयोजित मासिक प्रवासी मेळाव्यामध्ये पीएमपीकडे सर्वाधिक सूचना तक्रारी नोंदविणा-या सजग सक्रिय बस प्रवाशांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सतिश चितळे, संजय शितोळे आदी उपस्थित होते

मंचातर्फे मासिक, साप्ताहिक, दैनिक पास सर्वाधिक तक्रारी नोंदविणा-या प्रवाशांना प्रोत्साहनपर प्रायोजित करण्यात आले. यामध्ये एका महिन्यात २५ पेक्षा जास्त तक्रारी देणा-यांना एक दिवसाचा पास, ७५ पेक्षा जास्त तक्रारींकरीता एक आठवडयाचा पास आणि १५० पेक्षा जास्त तक्रारी करणा-यांना मासिक पास देण्यात आला. सु.बा.फडके, जयदीप साठे, रोहन निघोजकर, रणजीत घुले, अशोक बराटे, ॅड. शीला परळीकर, विपुल पाटील, रविराज चव्हाण यांना मोफत बस पास देऊन गौरविण्यात आले 

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, लोकशाहीचे चार स्तंंभ एकत्र आले तर प्रवासी केंद्रीत पीएमपी निर्माण होऊ शकते. नागरिकांकडून पीएमपी संदर्भात अनेक तक्रारी येत असतात, अशा जागृत नागरिकांच्या अनुभवामुळे पीएमपीचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल. प्रशासन आणि लोकसहभागातून पीएमपी अधिक सक्षम आणि सुरक्षित होण्यास प्रयत्न व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.   

जुगल राठी म्हणाले, स्वच्छ, सुरक्षित, पीएमपी सेवा देण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधिंची इच्छाशक्ती कमी पडत आहे. प्रवाश्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी, बसची वारंवारता वाढविण्यासाठी आणि प्रवासी केंद्रीत निर्णय होण्यासाठी स्थानिक प्रशासनाचा सहभाग वाढायला हवा. स्वस्त बस सेवा, प्रभावी, पारदर्शी हेल्पलाईन, डिजिटल फलक, सर्व बस थांब्यावर Posted On: 22 May 2017