ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेत सदाभाऊ खोत अनुपस्थित

पुणे, दि. २२ - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी फुले वाड्यात अभिवादन करुन या यात्रेला सुरुवात केली. पण कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत मात्र या यात्रेला उपस्थित नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई पायी चालत आत्मक्लेश यात्रा पूर्ण करणार आहेत. आजपासून सुरु झालेली ही यात्रा नऊ दिवसात मुंबईत पोहोचणार आहे.

नैतिक जबाबदारी म्हणून आत्मक्लेष यात्रा
फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य हमीभाव मिळाला नाही. हमीभावाचा निर्णय घेताना मीही त्यात सहभागी होतो. पण शेतकऱ्यांची फसवणूक झाली. या फसवणुकीत माझाही वाटा आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी आत्मक्लेष यात्रा काढली आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

हेच शहाणपण आहे : राजू शेट्टी
तर दीर्घ काळाच्या प्रवासात, जर काही वाटसरु भटकत असतील, तर त्यांच्यासाठी विचार करता पुढे जाणं हेच शहाणपण आहे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली
.