ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांबरोबर बारगेनिंगची भाषा सुरू आहे - लक्ष्मी त्रिपाठी

पुणे, दि. २३ - किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घेता शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय सरकारला बाजाराप्रमाणे वाटतो. त्यामुळे बारगेनिंगची भाषा सुरू आहे. हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत कठोर टीका केली.

आज सकाळी गंजपेठेतील महात्मा फुले वाड्यात येथे खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेष यात्रेला सुरवात झाली. त्रिपाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांचे यावेळी भाषण झाले. उपस्थितांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला. त्यानंतर त्रिपाठींनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कर्जमाफी दिली तर आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या, या भूमिकेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आत्महत्या हा बाजार आहे काय ? कोणाबरोबर बारगेनिंग करता? काय लावल आहे तुम्ही? जस्टिस वर्मा यांच्या ऑर्डरमुळे बलात्कारावर कायदा आला म्हणून बलात्कार थांबले कां? शेतकऱ्यांवर सध्या बलात्कारच सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल त्या म्हणाल्या, समाजाने जागृत झाले पाहिजे. आपल्याला शेतकरी जगवतात, याची जाण ठेवून त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे. मातीचे मोल, शेतकऱ्यांचा अभिमान नसलेल्या सुशिक्षितांची संख्या मोठी आहे. राजकीय व्यक्तींची तर चांगले करण्याची इच्छाशक्ती नाही. मात्र किन्नर लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर राहणार आहे.