ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जंगली महाराज रस्त्याचे स्वरुप बदलणार

पुणे, दि. २३ - पादचारी सुरक्षितता धोरणाअंतर्गत पुणे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना करण्याचे धोरण  महापालिकेने हाती घेतले आहे. या धोरणानुसार नागरिकांसाठी नव्याने पदपथांची निर्मिती, सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक निर्मितीसंभाजी उद्यानाच्या भिंतीवर आकर्षक वेली-फुलांची रचना करणे शिवाय विशेष व्यक्तींसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे अशी कामे या रस्त्यावरील बालगंधर्व ते संभाजी उद्यान यादरम्यान सुरू आहेत. सध्या हे काम अंतीम टप्प्यात असून यानंतर या रस्त्याचे स्वरुप बदलणार आहे.

महापालिकेने नेमलेल्या अर्बन प्लॅनरच्या माध्यमातून या रस्त्याचा आराखडा नव्याने बनवण्यात आला असून, त्यानुसार वाहतुकीसाठीची रुंदी कायम ठेवत फुटपाथ आणि इतर सुविधांची पुनर्रचना केली जाणार आहे. अशाप्रकारे  शहरातील प्रमुख १५ रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्याची सुरवात जंगली महाराज रस्त्यावरून करण्यात आली आहे.

संभाजी उद्यान आणि बालगंधर्व रंगमंदिरामुळे या फुटपाथचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या ठिकाणी बसण्याची अनेकांना इच्छा असते. त्यामुळे या रस्त्यावर नवीन पद्धतीची बैठक व्यवस्था केली असून सध्या अनेक नागरिक या ठिकाणी बसलेले दिसून येतात. या दरम्यानच्या रस्त्याच्या मधोमध काही भागांत नव्याने फुलझाडे आणि आकर्षक रोपे लावण्यात आली आहेत.

ही सर्व कामे करत असताना मुळच्या प्रशस्त असलेल्या या रस्त्याची रुंदी पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने करण्यात येणा-या पदपथांसाठी, सायकल ट्रॅकसाठी जागेचा वापर होणार असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा सोडण्यात आली आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून पीएमपीएमएलचे बसथांबे पुढे सरकले आहेत. शिवाय हा रस्ता शहरातील एक प्रमुख रस्ता आसल्याने या रस्त्यावरून दिवसभरात शहराच्या सर्वच भागात अमेक बस धावत असतात. या बसेस पुढे आलेल्या बसथांब्यावर थांबताच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येते. पादचारी सुरक्षा धोरणाची आखणी करत असताना या प्रशस्त रस्त्याची मोडतोड करण्यात Posted On: 23 May 2017