ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पीक

पुणे, दि. २४ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाबाबत सध्या सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण आहे. दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. यामध्ये बारावीचा निकाल २५ मे तर दहावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु या निव्वळ अफवा असल्याचं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

मागील वर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे काहींनी यंदाचा निकालही २५ मे रोजी जाहीर होणार असल्याचा मेसेज व्हायरल केला. परिणामी विद्यार्थीही संभ्रमात पडले आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. बोर्डाने निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्यात बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच दहावीचा निकालही याचदरम्यान लागेल, असं बोर्डाच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्यानंतर याबाबतचे सर्व अपडेट्स एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवेल.