ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणा-या महिलेला अटक

पुणे, दि. २४ -  मसाज पार्लरच्या नावाखाली तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेणार्या एका  महिलेला सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली. दरम्यान न्यायालयाने तिला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या कारवाईत सामाजिक सुरक्षा विभागाने दोन तरूणींची सुटका केली आहेहि कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने बंडगार्डन रस्त्यावरील गोल्ड फिल्ड प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दिव्यांग आयुर्वेदीक ब्युटी सलुनमध्ये मसाज सेंटरमध्ये सोमवारी (दि.२२) दुपारी पावणे चारच्या सुमारास करण्यात आली.

वर्षा आकाश चव्हाण (वय ३२, रा. शिवाजीनगर) असे पोलीस कोठडी दिलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर यांनी कोरेगांवपार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस नाईक तुषार आल्हाट यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की बंडगार्डन रस्त्यावरील गोल्ड फिल्ड प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दिव्यांग आयुर्वेदीक ब्युटी सलुनमध्ये मसाजच्या नावाखाली एक महिला तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेते. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा विभागाने या पार्लरवर छापा टाकला. यावेळी चव्हाण दोन तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी चव्हाण हिला अटक करून दोन तरूणींची सुटका केली.

ही कारवाई गुन्हे शाखेचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद म्हेत्रे, नितिन तरटे, तुषार आल्हाट, प्रदिप शेलार, नितीन तेलंगे, राजेश उंबरे, जयश्री जाधव, ननिता येळे, कविता नलावडे, सरस्वती कागणे, प्रगती नाईकनवरे यांनी केली.