ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या, अजित पवारांची मागणी

पुणे, दि. २५ - कुख्यात गुंड दाऊद इaब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी केली आहे.

दाऊदबाबत काडीचा संबंध नसताना शरद पवारांची बदनामी केली गेली. आता मात्र सरकारमधील जबाबदार मंत्री दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जातात. यावर चर्चा सुरु झाल्यानंतर मात्र थातूर- मातूर उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ही जी चूक झालीय त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जावा, तसंच त्यांनी  प्रायश्चित त्यांनी केलं पाहिजेअशी मागणी अजित पवार यांनी केली.

मुख्यमंत्री बचावले, परमेश्वराचे आभार

मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून वाचले त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर व्हीव्हीआयपी लोकांना महत्वाच्या कामासाठी अत्यंत व्यस्त दौरे असतात. मात्र हेलीकॉप्टरची देखभाल ठेवली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे. दुर्दैवाने अपघात घडला असला तरी  महाराष्ट्राच्या जनतेच्या सुदैवाने मुख्यमंत्र्यांना काही इजा झालेली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो, कुणाच्याही बाबतीत असा अपघाताचा प्रसंग उद्भवू नये, असं अजित पवार म्हणाले.