ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पुण्याच्या अंदाजपत्रकाविरोधातील याचिका फेटाळली

पुणे, दि. २६ - पुणे महानगरपालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात असमान निधी दिल्याने त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी न्यायलयात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्यावर आज (गुरुवार) अंतिम सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने विरोधकांची याचिका फेटाळून लावली. देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रथमच अंदाजपत्रकाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा प्रकार पुणे महापालिकेत घडला आहे.

पुणे महापालिकेचे आगामी वर्षाचे हजार ९१२ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभेपुढे सादर केले. त्यावर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या अंदाजपत्रकाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, योगेश जाधव यांनी धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्यावर २१ तारखेला महापालिकेतील दिवाणी न्यायालयाने महापालिका प्रशासनाला लेखी बाजू मांडण्याचे आदेश दिले.

या सर्व घडामोडी होत असताना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी याचिकाकर्त्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेऊन काही सूचना देखील केल्या. त्याबाबत काल बुधवारी महापालिकेतील दिवाणी न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्या दरम्यान या अंदाजपत्रकाला स्थगितीचा अर्ज देण्यात आला होता. तसेच न्यायालयाचा आदेश येईपर्यंत अंदाजपत्रकातील निधीच्या खर्चास मान्यता देऊ नये, असे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात आली. यावेळी अंतरिम स्थगितीमुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा बाधित होतील, असे महापालिकेच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडले. त्यावर कोर्टाने अंतिम सुनावणीपर्यंत अंदाजपत्रकातील निधी खर्च करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. यावेळी जबाबदारी घेण्यास महापालिकेचे वकील, विधी सल्लागार कोणीच पुढे आले नाही. हे लक्षात आल्याने न्यायालयाने आज गुरुवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी करणार असल्याचे सांगितले होते.

आज या याचिकेवर अंतिम सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.