ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर

पुणे, दि. २६ - १६ व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थीती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या कामगिरीबद्दल मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने सलग तिस-या वर्षी संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

चेन्नई आयआयटी मद्रास येथे शनिवारी (दि.२७) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल आणि  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर  यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर कोल्हापुरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा संसद रत्न पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. 

मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच निवडून आले आहेत. निवडून आल्यापासून त्यांनी कामाचा धडका लावला आहे. देशाचे, राज्यातील विविध महत्वाचे प्रश्न त्यांनी लोकसभेत उपस्थित केले आहेत. संसदेतील विविध चर्चेमध्ये ते सहभागी होतात. त्याच्या कामगिरीबद्दल त्यांना सलग दोन वर्ष संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

खासदारांची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थीती यासंदर्भात पीआरएस इंडीयाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मुल्यांकन निवड समिती मार्फत करण्यात येते. त्यानुसार चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने संसद रत्न हा पुरस्कार दिला जातो.