ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पोलीस आयुक्तांच्या छळामुळे गर्भपात झाल्याचा राठोड दाम्पत्याचा आरोप

पुणे, दि. २७ - पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह इतरांनी आमचा मानसिक शारीरिक छळ केला. तसेच नऊ महिन्यांची गर्भवती असताना पोलीस आयुक्तांच्या त्रासामुळे गर्भपात झाल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांच्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणा-या राठोड दाम्पत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर पादक्रांत केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातील निलंबित राठोड दाम्पत्य पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आले. आज शुक्रवारी तारकेश्वरी राठोड दिनेश राठोड यांनी पुणे श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत घेतली.

यावेळी राठोड म्हणाले की, २३ मे २०१६ रोजी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले असून, त्यासंबंधी नेपाळ सरकारचे प्रमाणपत्र आमच्याकडे आहे. त्यांनी आमच्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, तरीही दहा वर्ष बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. सुरेंद्र शेळके आणि अंजली कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून कपटी बुद्धीने आमची चौकशी सुरू केली. चौकशीला आम्ही हजर राहिले आहोत. यापूर्वीही माध्यमांना बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांशी बोलल्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

सुरेंद्र शेळके हा एजेंट आहे. त्यांना पैसे दिल्याने हे सर्व सुरू केले आहे, असाही आरोप राठोड दाम्पत्यांनी यावेळी केला. निलंबित केल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या. त्यानंतर पाच दिवसांनी आम्हाला निलंबित केल्याची नोटीस आली. तर, आताही बडतर्फ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असून, अद्याप आम्हाला बडतर्फ केल्याची नोटीस आलेली नाही. तसेच, हे प्रकरण मॅटमध्ये असून, त्याची विभागीय चौकशी अद्याप सुरू आहे. त्यामुळे असे बडतर्फही करता येऊ शकत नाही. याप्रकरणी मानव अधिकार आयोगाकडे तक्रार करून दाद मागितली असल्याचे राठोड दाम्पत्यांनी सांगितले. 

तर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे २५ लाखांची खंडणी मागणारे निरीक्षक धुमाळ प्रकरणात चालढकल केली जात असून, त्यांना आयुक्तांचे पाठबळ आहे. याप्रकरणाकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.