ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दख्खनच्या राणीला वाढदिवसाची भेट, नवीन डायनिंग द फर्निचरमध्येही बदल

पुणे, दि. २९ - गेल्या ८७ वर्षा पासून आपल्या प्रवासीरुपी लेकरांना नियमित पुण्यावरून मुंबईला आणि मुंबईवरून पुण्याला ने-आण करणारी पुणे-मुंबईकारांसोबत सगळ्या महाराष्ट्राची राणी 'डेक्कन क्वीन एक्सप्रेसअर्थात दख्खनच्या राणीला वाढदिवसाची भेट म्हणून नवीन डायनिंग कार मिळणार आहे. येत्या जूनला डेक्कन क्वीन ८८ व्या वर्षात पर्दापण करत आहे. गाडीला जुलैमध्ये नवीन डायनिंग कार बसवणार असून फर्निचर अंतर्गत रचनाही बदलण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या पुढाकाराने दख्खनच्या राणीची डायिनग कार कात टाकणार आहे. अंतर्गत सुविधांमध्ये त्याचप्रमाणे रचनेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. रंगसंगती आणि बैठक व्यवस्थाही बदलण्यात येणार आहे. रोजच्या प्रवाशाला डेक्कन क्वीन म्हणजे घरच असून, प्रवासाबरोबरच गाडीच्याडायनिंग कारलाही एक वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे बदललेली रचना पाहण्यासाठी प्रवासीही उत्सुक आहेत. लिम्का बुकमध्ये नोंद असलेली आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळालेल्या डेक्कन क्वीनची डायिनग कार डिसेंबर २०१४ ला काढण्यात आली होती. प्रवाशांची मागणी आणि हर्षा शहा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जून २०१५ मध्ये गाडीच्या ८६ व्या वाढदिवशी डायनिंग कार पुन्हा जोडण्यात आली होती

दरम्यान, दख्खनच्या राणीचा वाढदिवस पुणे रेल्वे स्थानकावर यंदाही मोठ्या थाटामाटात केक कापून साजरा करण्यात येणार असून त्यासाठी सर्वाना आमंत्रणही देण्यात आले आहे.