ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

२ जूनपासून राज्यात दाखल होणार मान्सून

पुणे, दि. २९ - संपूर्ण राज्यात , आणि जूनपासून मान्सून दाखल होईल, असा अंदाज कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला असून शिवाय राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल, असेही साबळे यांनी म्हटले आहे.

हा शेतकऱ्यांसाठी उत्तम हंगाम असून ६५ मिलीमीटर पावसाची नोंद राज्यात झाल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे. कमी दिवसात जास्त पाऊस पडणार आहे. मात्र काही काळ पावसाचा खंडही असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दिवसात मान्सून केरळात दाखल होणार असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होण्याची शक्यता आहे. उन्हाने त्रस्त झालेल्या लोकांना आणि बळीराजालाही यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्णाण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून वारे वेगानं सरकत आहेत.