ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बारावीचा निकाल ८९.५० टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

पुणे, दि. ३० - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला. बारावीच्या यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी परीक्षेच्या निकालाची विभागवार माहिती दिली. त्यानुसार या परीक्षेत एकूण ८९.५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या ८६.६५ टक्के तर मुलींची संख्या ९३.०५ टक्के इतकी आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारीमार्च २०१७ मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना आज दुपारी वाजेपासून ऑनलाइन पाहता येणार आहे. जून ला गुण पत्रिका वाजता शाळेत मिळणार आहेत. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनःपरीक्षा ११ जुलै पासून घेण्यात येणार आहे.