ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पर्वती येथे नागरिकांच्या सतर्कतेने मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

पुणे, दि. ३१ - पर्वती दर्शन परिसरातील १२ वर्षीय मुलीला पळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका बुधवार पेठेतील आरोपी महिलेला काल ( मंगळवारी) नागरिकांनीच पकडून प्रसंगावधान दाखवत पोलिसांच्या स्वाधीन केले. संबधित महिला बुधवार पेठेतील असल्याने या घटनेतून लहान मुले पळवणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून छोटय़ा मुलांना पळवण्याच्या प्रकाराने नागरिक धास्तावले आहेत.

तारादेवी तमांग (वय ३०, बुधवार पेठ, पुणे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पर्वती दर्शन परिसरात राहणारी बारा वर्षीय मुलगी काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंडी आणण्यासाठी दुकानात गेली असताना हा प्रकार घडला. आरोपी महिलेने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला जवळ बोलावले आणि तिच्या हाताला धरून तिला ओढून घेऊन जाऊ लागली. दरम्यान पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तिची सुटका केली. 

त्या ठिकाणी जमलेल्या महिलांनी आरोपी महिलेला पकडून पंचशील चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. सबंधित महिला बुधवार पेठेतील असल्याने ती मुलीला कशासाठी पळवून नेत होती याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या घटनेतून मुलींना पळवून नेणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.