ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डेक्कन क्वीन चे ८८ व्या वर्षात पदार्पण

पुणे, दि. १ - गेल्या ८७ वर्षांपासून चाकरमान्यांना साथ देणारी डेक्कन क्विन आज ( जून) ८८ वर्षांत पर्दापण करत आहे. याचे औचित्य साधून प्रवाशातर्फे आज सकाळी केक कापून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी डेक्कन क्वीनच्या काही डब्ब्यांना फुगे लावण्यात आले होते, फुलांची सजावट करण्यात आली होती. येणाऱ्या प्रत्येक प्रवेशाचे केक देऊन स्वागत करण्यात येत होते. पुणे ते मुंबई सुखरूप प्रवास घडवणाऱ्या लाडक्या राणीचा वाढदिवस साजरा करताना प्रवाशांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. या गाडीसोबत सेल्फी घेण्यात अनेक प्रवाशी दंग झाल्याचे चित्र आज सकाळी पुणे रेल्वे स्टेशनवर होते.

या रेल्वेच्या वाढदिवसाला पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर, रेल्वे प्रवाशी मंचच्या हर्षा शाह, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि डेक्कन क्वीनचे दैनंदिन प्रवासी यावेळी सहभागी झाले होते.

यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या की, गेली ८७ वर्षे या गाडीने लाखो प्रवाशांना पुणे ते मुंबईचा प्रवास सुखरूप प्रवास घडवला. डेक्कन क्वीनमुळे पुणे ते मुंबई हा प्रवास आधिक सुखकर आणि जवळचा झाला या गाडीचा पुणेकर या नात्याने मला सार्थ अभिमान वाटतो.

 पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमाळकर म्हणाले, मुंबई विद्यापीठात जाण्यासाठी आणि आयआयटीला असताना अनेकवेळा डेक्कन क्वीनने मी प्रवास केला आहे. त्या प्रवासातील अनेक आठवणी आजही माझ्या मनात घर करून आहेत. त्या काळात अनेक लोकांशी झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्याची भावना त्यांनी व्यक्ती केली.

रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, पाच वर्षांची असल्यापासून मी डेक्कन क्वीन ने प्रवास करते. त्यामुळे या गाडीच्या अनेक चांगल्या वाईट घटनेची मी साक्षीदार आहे. डेक्कन क्वीन म्हणजे माझे पाहिले प्रेम आहे. या गाडीने पुणे, मुंबई शहरातील नागरिकांना जवळ आणले आहे.