ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सबंध देशात आणि महाराष्ट्रात बळीराजा संकटात - शरद पवार

पुणे, दि. १ - सबंध देशात आणि महाराष्ट्रात बळीराजा जास्त संकटात आहे. त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे. ग्राहकांनी सुद्धा त्याच्या हिताची जपणूक केली पाहिजे. त्याच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. सरकार यावर शहाणपणाने निर्णय घेईल आणि बळीराजाच्या अडचणी दूर होऊन बळीचे राज्य येईल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली 

महिला आरक्षणाला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महापौर मुक्ता टिळक, खासदार सुप्रिया सुळे, माजी केंद्रिय सचिव राधा सिंग, खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीच्या शहरअध्यक्ष वंदना चव्हाण, पुणे महापालिकेचे गटनेते चेतन तुपे, काँग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे, संजोग वाघेरे, मंगला कदम आणि काँग्रेसच्या नगरसेविका उपस्थित होते. 

पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हा विषय चिंतेचा आहे. गेल्या तीन वर्षात १२ हजार शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. त्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल. सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सरकरसोबतच जनतेनेही पुढाकार घेतला पाहिजे असे ते म्हणाले. 

नागालँड सारख्या राज्यात ९९ टक्के साक्षरता आहे आणि फुलेंच्या महाराष्ट्रात ८० टक्के आहे. याविषयी जाणून घेतले असता तेथील सर्व प्रमुख कामे महिलांच्या हातात आहेत. त्यामुळे त्याठिकाणी साक्षरता असल्याचे जाणवले. महिलांना माहित असत की हवंय आणि काय नाही.
सरंक्षण खात्यात असताना महिलांना लष्करात घेण्याचा विषय ३ महिने मांडत होतो. त्यानंतर मी चर्चा बंद केली आणि तीनही दलात महिलांना प्रवेस देण्याचा निर्णय मी घेतला. जगाच्या तुलनेत हवाई दलात भारतात अधिक अपघात होत होते. परंतु महिलांच्या हवाई दलातील प्रवेशानंतर हे अपघात कमी झाले असे मला हवाई प्रमुखांनी सांगितले. दिलेलं काम बारकाईने करण्याची दृष्टी महिलांची असते, तर दिलेलं काम सोडून दुसरीकडे लक्ष