ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन गाढवाला देत मुख्यमंत्र्यांचा निषेध

पुणे, दि. ३ - राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाबाबत सरकारने काही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. त्याचा निषेध करत पुणे शहरातील शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गाढवाला निवेदन दिले आणि त्याच्या गाढवाच्या निषेधाचे पत्र लटकवत हे सरकार गाढव असल्याचा घोषणा देत सरकारचा निषेध केला. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे, शेतकरी कामगार संघटनेचे विठ्ठल पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल पवार म्हणाले, ज्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या ते भाजप पुरस्कत नेते आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेता मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. सरकारला जर खरच संप मिटवायचा असेल तर त्यांनी शेतक-र्यांमध्ये भेदभाव करता सरसकट कर्जमाफी करावी आणि तसे लेखी आदेश द्यावेत. अशी मागणी त्यांनी केली. 

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले, राज्य सरकार आंदोलनकर्त्या शेतक-यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न