ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

गणेश उत्सवादरम्यान पुण्यातून कोकणाकडे सुटणार ५४ विशेष रेल्वे

पुणे, दि. ३ - गणेश उत्सवात कोकणाकडे जाणा-या लोकांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने १४२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पैकी पुणे स्थानकावरून पुणे-सावंतवाडी, करमाळी-पुणे, सावंतवाडी-पुणे दरम्यान ५४ विशेष गाड्या सुटणार आहेत. १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावणा-या विशेष गाड्यांचे आरक्षण जूनपासून सुरू होत आहे. 

पुणे-सावंतवाडी रोड (दैनिक) गाडी क्रं. ०१४४७ पुणे स्थानकावरून सकाळी ०८.५० वाजता निघून त्याच दिवशी रात्री २०.२० वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी १९ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, थिविम आणि झराप स्थानकांवर थांबणार आहे. 

करमाळी-पुणे (दैनिक) गाडी क्रं. ०१४४६ करमाळी स्थानकावरून दुपारी :२५ वाजता निघून दुस-या दिवशी पहाटे ०५:५० वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. ही गाडी १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून थिविम, मदूरे, सावंतवाडी रोड, झराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावरडे, चिपळूण, खेड, वीर, मानगाव, रोहा, पनवेल आणि लोणावळा स्थानकांवर थांबणार आहे. 

पुणे-सावंतवाडी- पुणे (साप्ताहिक वातानुकूलित) गाडी क्र. ०१४२३ ही विशेष गाडी २४ ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी पुणे स्थानकावरून सायंकाळी :४५ वाजता पुणे स्थानकावरून सुटून दुस-या दिवशी सकाळी ०७.०० वाजता सावंतवाडी स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच पुणे-सावंतवाडी- पुणे (साप्ताहिक वातानुकूलित) गाडी क्रं. ०१४२४  ही गाडी २५ ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत प्रत्येक शुक्रवारी सावंतवाडी स्थानकावरून सकाळी ०९.३० वाजता निघून त्याच दिवशी ११:३५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, मानगांव, वीर, खेड,