ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० टक्के भाज्यांची आवक

पुणे, दि. ५ -  मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतरही नाराज असलेल्या शेतकऱ्यांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही महामार्गांवर शेतकरी चक्का जाम आंदोलन करीत रास्ता रोको केल्याने वाहतूक व्यवस्था काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत केवळ ३० टक्के आवक झाली असून साधारण ३३९ गाड्या पोहचल्या आहेत. तर संपच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशीच भाजी खरेदी करुन ठेवल्याने बाजारात आलेल्या भाज्यांना हवा तसा उठाव नसल्याचे चित्र आहे. पालेभाज्यांचे गगनाला भिडलेले भाव काही प्रमाणात कोसळले असून ४० रुपयांना मिळणारी कोथिंबीरीची गड्डी २० रुपयांना तर पालकाची २० रुपयांची गड्डी रुपयांनी विकली जात आहे 

पुणे भाजारपेठेप्रमाणे पिंपरी उपबाजार समितीवरही परीणाम झाला असून आज फळभाज्यांच्या आवकमध्ये ५० टक्क्यांनी घट झाल्याने त्यांचे कालपर्यंत घसरलेले भाव २२ टक्क्यांनी वाढले आहेत. पालेभाज्यामध्ये मात्र फारसा फरक पडलेला नाही. मात्र त्यातही काही प्रमाणात आवक घटली आहे. अगदी खराब कोथींबीरीची जुडी देखील ते १० रुपयांना ठोक दरात विकली जात आहे, असे पिंपरी उपबाजार समितीचे विभाग प्रमुख आर.सी. शिंदे यानी सांगितले.

बंद काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एसटी बस थांबवावी असा आदेश एसटी चालक - वाहकांना देण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून तात्काळ पोलिसांना तसेच वरिष्ठांना माहिती द्यावी असेही आदेशात म्हटले आहे. 

दरम्यान, शुक्रवारी (दि. ) रोजी मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या पूर्ण केल्याचे जाहीर केले होते. मात्र, हा निर्णय शेतक-यांना मान्य नसून जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेण्याचा निर्धार शेतक-यांनी व्यक्त केला आहे.