ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे रेल्वे स्थानकावर साकारले ४०० मीटर लांबीचे भित्तीचित्रांचे अभयारण्य

पुणे, दि. ५ -  रेल्वे स्थानक म्हणजे अस्वच्छता, कंटाळवाणे ठिकाण या संकल्पनेवर मात करत पुणे रेल्वेस्थानक त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (रविवारी) पुणे रेल्वेस्थानकावरील फ्लाट क्रमांक वर ४०० मीटर लांबीचे अभयारण्यातील प्राण्यांच्या भित्तीचित्रांचे अनावरण करण्यात आले.

हे आनावरण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते व्हिडिओ कॉलिंगद्वारे करण्यात आले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, अभिनेता जॅकी श्रॉफ, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, पुण्याचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वन्यजीव संरक्षक के. पी. सिंग यांच्यासह वन विभागाचे अन्य अधिकारी नेचर वॉकचे अनुज खरे उपस्थित होते.

मध्य रेल्वेचा पुणे विभाग, पुणे वन विभाग आणि नेचर वॉक यांच्या वतीने पुणे वन्यजीव विभागातील विविध अभयारण्यातील जैवविविधतेवर आधारित चित्रे काढण्यात आली आहेत. या ४०० मीटरच्या भित्तीचित्रामध्ये १०५ कलाकृतींचा समावेश आहे. ही भित्तीचित्रे सीताराम घारे देवीदास कासेकर यांनी ही चित्रे साकारली आहेत. प्रवाशांना रेल्वेस्थानकावर वेळ घालवणे देखील सुखद वाटावे यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर विविध उपक्रम राबवले जात आहे. या उपक्रमामुळेच देशातील सर्वोत्तम रेल्वे स्थानकामध्ये पुण्याने वा क्रमांक पटकवला आहे.