ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे मेट्रो होणार पर्यावरण पूरक - डॉ. ब्रिजेश दीक्षित

पुणे, दि. ६ -  नागपूर मेट्रो पाठोपाठ मागील सहा महिन्यांपूर्वी पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. पुणे मेट्रोला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून पाणी, हवा, माती आणि एकूणच पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवता मेट्रो प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोचा पूर्ण कल सौरऊर्जेवर असून जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बनविण्याचा मानस असल्याचे पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दीक्षित बोलत होते. यावेळी महामेट्रोच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम्, महामेट्रोच्या सल्लागार समितीचे शशिकांत लिमये, पिंपरी-चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश खडके आदी उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोला पर्यावरण पूरक बनविण्यासाठी सौरऊर्जा अतिशय महत्वाचा घटक आहे. हवा, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषण अत्यंत कमी किंवा शून्य प्रदूषण करण्यात येणार आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी एखाद्या झाडाला तोडावे लागत असेल तर ते झाड तोडता त्याचे स्थानांतरण करण्यात येईल आणि स्थानांतरित केलेल्या प्रत्येक झाडामागे दहा झाडे लावली जाणार आहेत. पुणे मेट्रोच्या कामादरम्यान डीपीआर प्रमाणे ६८५ झाडे तोडावी लागणार असून महामेट्रोच्या वतीने नजीकच्या भविष्यात तब्बल ७ हजार वृक्षांचे रोपण होणार असून पुणे मेट्रोच्याग्रीन इनिशिएटिव्हअंतर्गत ही वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार आहे. महामेट्रोच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील सेक्टर २९ येथील पाच एकर जागेत वृक्षारोपण करण्यात आले.

यामुळे केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील १३७ टन कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. पुणे मेट्रो नियोजनापासूनच पर्यावरणपूरक अपारंपारिक उर्जेच्या वापरावर भर देणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ६५ टक्के उर्जा ही सौर ऊर्जेद्वारे मिळविण्याचा आमचा प्रयत्न