ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महापालिकेत शिवसेनेचे भीक मांगो आंदोलन

पुणे, दि. ७ - पुणे शहरात २४ तास समान पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी हजार २६४ कोटी रुपयांच्या कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेत शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत आणि महापालिका शिवसेना गट नेता संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या आवारात भीक मांगो आंदोलन करण्यात आलेया आंदोलनात विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. काका आमचे खाऊ चे पैसे घ्या, मात्र महापालिकेला कर्ज बाजारी करू नका या आशयाचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

उदय सामंत म्हणाले की, पुणे शहरात समान पाणी पुरवठा योजना ऱाबवण्यासाठी महापालिका कर्ज घेऊन हा प्रकल्प सुरु करणारा आहे. या निर्णयाचा निषेध असून ज्या भाजपला पुणेकर नागरिकांनी भरभरून दिले असताना र्ज घेण्याची वेळ आली ही दुर्देवी बाब आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या कामासाठी निधी दिला पाहिजे. प्रस्तावाला शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात तीव्र विरोध करतील.