ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महापालिकेचा आंबेडकर पुरस्कार नागराज मंजुळे यांना जाहीर

पुणे, दि. ७ - आंबेडकरी चळवळींमध्ये काम करणा-या व्यक्तीला पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा सन २०१६ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मागील पाच वर्षांपासून दिला जात आहे. पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात रविवार (दि. ११) रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय विशेष सहाय्य राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

नागराज मंजुळे महाविद्यालयीन जीवनापासून आंबेडकरी चळवळींमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी बनविलेले पिस्तुल्या (लघुपट), फॅन्ड्री, सैराट हे समाजातील विशेष वर्गाचे वर्णन करणारे होते. त्या चित्रपटांनी समाजावर विशेष छाप पाडली आहे. उन्हाच्या कटाविरुद्ध हा कवितासंग्रह देखील मंजुळे यांनी लिहिला आहे. त्यांनी आपल्या भाषणांमधून तसेच चित्रपट निर्मितीतून आंबेडकरी चळवळींना चांगलीच गती दिली आहे.