ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेना कायम शेतकऱ्यांसोबत, वेळ आल्यास कठोर निर्णय घेऊ - संजय राऊत

पुणे, दि. ७ - राज्यभरात शेतक-यांमध्ये संतापाची लाट उसळली असताना सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करणे गरजेचे आहे. सरकारने शेतक-यांना कुठल्याही प्रकारच्या अटी घालता सरसकसकट कर्जमाफी केली पाहिजे. तीन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही सरकार शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करणार नसेल तर सत्तेत सहभागी होण्याचा काय फायदा?   शिवसेना कायम शेतकऱ्यांसोबत आहे, शेतक-यांच्या मागण्यांसदर्भात उद्या जर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर मागेपुढे पाहता लगेच घेऊ, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सरकार शेतक-यांच्या मागण्यासंदर्भात राजकारण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांकडे शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला असता, त्यांनी ते नाकारले. त्यामुळे आज आम्ही कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्याशी चर्चा करावी आणि शेतक-यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. सरकारला पाठिंबा देणा-या राजू शेट्टींची शेतक-यांच्या बाबतीतील भूमिका दुटप्पीपणाची असल्याचे सांगत सदाभाऊंना सोबत घेऊन चर्चा कशाला चर्चा करायची ? असा सवाल विचारला.

राज्यात सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना काय विरोधी पक्षाची भूमिका घेत आली आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीत चर्चा करताना सरकारतर्फे शिवसेनेला गृहीत धरले नाही. शेतक-यांच्या संपाविषयीही शिवसेनेने नेमकी सरकारविरोधात भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या प्रक्रियेत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाही शिवसेनेच्या मंत्र्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यात आले नव्हते.