ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी महापालिका स्थायीच्या बैठकीला जाणार नाही - तुकाराम मुंढे

पुणे, दि. ८ - पीएमपीएमएल ही एक स्वतंत्र कंपनी आहे. पीएमपीएमएलला निधी देण्याविषयीचा प्रस्ताव स्थायी समिती सर्वसाधारण सभेसमोर मांडण्याचा अधिकार पदाधिका-यांचा आहे. याशिवाय पिंपरीचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष पीएमपीएमएलवर संचालक आहेत, असे असतानाही आपण उपस्थित राहण्याची मागणी करणे चुकीचे आहे. पीएमपीएमएलची माहिती देण्यास आपण तयार असून पिंपरी महापालिकेत जाणार नसल्याचे, पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांनी आज (बुधवारी) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, मुंढे आल्याशिवाय पैसे देणार नसल्याच्या भूमिकेवर पिंपरी पालिकेची स्थायी समिती ठाम आहे.

पीएमपीएमएल ही कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संलग्न आहे. पिंपरी महापालिका पीएमपीएमएलला पैसे देते. पैसे नेण्यासाठी अधिकार नसलेले अधिकारी येतात. परंतु, पीएमपीचे अध्यक्ष मुंढे येत नाहीत. त्यांनी आमच्या अडी-अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. पीएमपीएमएलबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे मुंढे पिंपरी पालिकेत आल्याशिवाय पैसे देणार नसल्याची भूमिका, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली आहे.

पीएमपीएमएलला पैसे देण्याचा विषय स्थायीच्या विषयपत्रिकेवर आहे. गेल्या तीन सभांपासून हा विषय तहकूब ठेवला आहे. मुंढे यांनी समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेत यावे. यासाठी आपण त्यांना १७ दिवसांपूर्वी पत्र दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्याचे उत्तर आले नसल्याचे, सावळे यांनी सांगतिले. जोपर्यंत आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुंढे पालिकेत येत नाहीत, तोपर्यंत निधी देणार नसल्याचे, सावळे यांनी सांगितले.

पिंपरी पालिकेचे महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे  पीएमपीएमएलवर संचालक आहेत. असे असताना निधीसाठी आपण पिंपरी महापालिकेत यावे, अशी मागणी करणे चुकीची आहे. पीएमपीएमएलची माहिती देणे हे आपले कर्तव्य असून ती  देण्यात आपण तयार आहोत. पंरतु, पालिकेत उपस्थित रहावे, ही मागणी चुकीची असून आपण पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला येणार नसल्याचे, तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

Posted On: 08 June 2017