ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजप सरकार काँग्रेसचा आवाज दाबत आहे - विश्वजीत कदम

पुणे, दि. ९ - मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेली अटक हे अराजकतेचे लक्षण असल्याचे सांगत भाजप सरकार काँग्रेसचा आवाज दाबण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला. राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या आंदोलनात काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी आमदार, काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष आणि युवक काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मंदसौर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी काल ( जून) राहुल गांधींना अटक केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज पुणे रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो हाणून पाडला. आज सकाळपासूनच पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेसच्या नेत्यांना मुख्य प्रवेशद्वारासमोर एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वे स्थनकार घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले होते. नंतर परिस्थिती निवळल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

याविषयी बोलताना कदम म्हणाले, आम्ही परवानगी घेऊनच आंदोलन केले होते. परंतु पोलिसांनी आम्हाला आणि काही महिला आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने अडवले. आंदोलन चिरडण्याच्या सूचना सरकारनेच पोलिसांना दिल्या असून शेतकऱ्यांना भेटणे गुन्हा आहे काय? असा प्रश्न विचारत सरकार विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप त्यांनी केला.