ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या स्पर्धेत आकुर्डीचे तरुण मित्र मंडळ प्रथम

पुणे, दि. ९ - पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये आकुर्डीतील तरुण मित्र मंडळाला ५१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. विजेत्या  मंडळांना चिंचवड येथे येत्या सोमवारी (दि. १२) बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सचिव माणिकराव चव्हाण, विश्वस्त दंतोपंत केदारी, माजी उपमहापौर कैलास भांबुर्डे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, परीक्षक दत्तात्रय भोंडवे, दिलीप माळी, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, संभाजी सूर्यवंशी, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.

बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येत्या सोमवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. ट्रस्टमार्फत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील १४७ मंडळांनी सहभाग घेतला Posted On: 09 June 2017