ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बैठकीत महिला स्पेशल बसवरून मुंढे व सावळे यांच्यामध्ये घमासान

पुणे, दि. १० -  पुणे महानगरपरिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या संचालक   मंडळाची आज (शुक्रवारी) झालेली पहिलीच बैठक वादळी ठरली. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आणि पिंपरी महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची आज (शुक्रवारी) पहिलीच बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरीचे महापौर नितीन काळजे, पुण्याचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या सीमा सावळे, सिद्धार्थ शिरोळे, पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते
.
पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात मुली महिलांसाठी स्वतंत्र महिला स्पेशल बस का धावत नाहीत, असा प्रश्न सावळे यांनी उपस्थित केला. तर, शहरात सहा मार्गावर स्वतंत्र बस धावत असल्याचे मुंढे यांनी ठामपणे सांगितले. त्यावर मुंढे संतापले आणि त्यांनी हातातील फाईल खाली फेकून दिली आणि तुम्हीच पीएमपीएमएल कंपनी चालवा, असे संतप्त होऊन म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र बस धावत नसल्याचे समजल्यावर मुंढे यांनी माफी देखील मागितल्याचे, सावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात अंतर्गत बस सेवा नाही. अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात यावी. त्यामुळे पीएमपीएमएलला उत्पन्न मिळेल. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरू करावी, तिर्थक्षेत्र देहू, आळंदीला बस सेवा सुरू करण्याची मागणीही, सीमा सावळे यांनी केली आहे. त्यावर मुंढे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे, सावळे यांनी सांगितले. पीएमपीएमएलबाबतच्या नगरसेवकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी तुकाराम मुंढे पिंपरी-चिंचवड महापालिकेत येणार असल्याचेही सावळे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा. त्यासाठी पिंपरी Posted On: 10 June 2017