ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मान्सूनच्या पावसाचे आगमन

पुणे, दि. १२ - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मान्सूनचे आगमन झाले आहे. सोमवारी (दि.१२) शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारपासून पुण्यातील काही भागात तर पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, निगडी, आकुर्डी, वाकड, पिंपळेगुरव, पिंपळेनिलख परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत होते. आज सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ भागातील गावांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीकपात करण्यात आली आहे. पाऊस आल्यावर पाणीकपात मागे घेण्याचे सत्ताधा-यांनी सांगितले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.