ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

यंदाही मुलींचीच बाजी, राज्याचा एकूण निकाल ८८.७४ %

पुणे, दि. १३ - राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोकण विभागाने ९६.१८ टक्के मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत राज्याचा यंदा दहावीचा निकाल .८२ टक्क्यांनी घटला असून तो ८८.७४ टक्के लागला आहे. राज्यात दहावी परीक्षेत यंदा मुलींनी बाजी मारली आहे.  राज्यातील १६ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र दिसत असून ९१.४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

कोल्हापूर विभागाचा निकाल - ९३.५९ टक्के, मुंबई - ९०.०९ टक्के, पुणे- ९१.९५ टक्के, औरंगाबाद - ८८.१५ टक्के, नागपूर - ८३.६७टक्के आणि लातूरचा निकाल - ८५.22टक्के इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार असून निकालाची गुणपत्रिका २४ जूनला त्यांच्या शाळांमध्ये मिळणार आहे.या वेबसाईटवर निकाल पाहू शकता. 

दहावीच्या परिक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १६लाख ५० हजार ४९९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ४४ हजार १६ परीक्षेस प्रविष्ट झाले. १४ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८८.७४ आहे.

या परिक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण लाख १४ हजार ३७ पुनर्परिक्षार्ध्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी लाख १३ हजार १२४ परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ४७ हजार ६३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४२.१० आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल ९६.१८ सर्वाधिक असून सर्वात कमी नागपूर विभागाचा Posted On: 13 June 2017