ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी, देहूसाठी पीएमपीएमएलच्या जादा गाड्या

पुणे, दि. १४ - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगरपरिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) वारक-यांसाठी पीएमपीएमएलच्या जादा बस आज (बुधवार) पासून सोडण्यात येणार आहेत. आळंदीसाठी ६५, तर देहूसाठी २० बस मार्गावर धावणार आहेत. याशिवाय देहू ते आळंदी या मार्गासाठी बारा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहर, उपनगरांबरोबरच अनेक गावांतून आळंदी आणि देहू येथे भाविकांची गर्दी होते. त्यामुळे पीएमपीएमएलकडून दरवर्षी जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात येते.

१४ ते १८ जूनपर्यंत यंदाही आळंदीकरिता स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड या ठिकाणावरून सध्या संचलनात असणा-या बसेस जादा बसेस अशा दिवसाला एकून ६५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. शनिवार (दि.१७) पर्यंत आळंदी करिता बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, देहूकरिता पुणे स्टेशन, मनपा, निगडी या ठिकाणावरून संचलनात असेल्या २० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय देहू ते आळंदी अशा १२ बस ठेवण्यात आल्या आहेत.

माउलींच्या पालखीचे रविवारी (दि.१८) रोजी प्रस्थान होणार असल्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणावरून ३२ जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियमित संचलनात असणा-या बस गाड्या सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ५५ बसेस आळंदीसाठी भोसरी विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात असणार आहेत. प्रवाशांच्या गरजेनुसार जादा बसही देण्यात येणार आहेत.

पुण्याहून  पालखी प्रस्थानाच्या वेळेस मंगळवारी (दि.२०) रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी थांबणार आहेत. त्यामुळे महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, Posted On: 14 June 2017