ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राजकीय पक्षांना पालखी मार्गावर मंडप, स्वागत कमानी उभारण्यास मनाई

पुणे, दि. १५ - निगडी ते आकुर्डी दरम्यान पालखी मार्गावर सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय पदाधिकारी यांना मंडप, स्टॉल किंवा कमानी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आणि पालखी मार्गाला अडथळा ठरू नये, याकरिता महापालिकेची एक कमान स्वागत कक्ष वगळता अन्य कोणत्याही संस्थेला परवाने देण्यात येऊ नयेत, अशी सूचना पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १७ जून रोजी आकुर्डी येथे मुक्कामी येणार आहे. पालखी सोहळा शहरात आल्यानंतर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटना, मंडळे तसेच राजकीय पदाधिका-यांमार्फत वारक-यांचे स्वागत करण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी मंडप, स्वागत कमानी उभारण्यात येतात. मात्र, या मंडप आणि कमानींमुळे पालखी मार्गाला अडथळा निर्माण होतो.

तसेच दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कमानी आणि मंडप अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे पोलिसांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. कोणत्याही संस्था, संघटनेला स्वागत कमानी अथवा मंडप टाकण्यासाठी परवाने देण्यात येऊ नयेत, अशी सूचना पत्राद्वारे करण्यात आली आहे.