ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

खडकीच्या दारुगोळा कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू

खडकी, दि. १५ - खडकी येथील दारुगोळा कारखान्यात स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगारांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी घडली. अशोक काशिनाथ डुबल (वय ४८) यश मारिया रॉक (वय ५०, दोघे रा. खडकी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहे. या दुर्घटनेत अन्य दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खडकी येथे संरक्षण खात्याचा दारुगोळा कारखाना आहे. या कारखान्यात कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते. अचानक सव्वानऊच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन स्फोटक वस्तू एका जागेवरून दुस-या जागेवर वाहून नेत असताना या दोन वस्तूंची टक्कर झाली आणि हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेखडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत