ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे एजंटशिवाय मिळावीत, आंबेडकरी संघटनेची मागणी

पुणे, दि. १५ - दहावी बारावीचे निकाल लागले आहेत. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. महाविद्यालयातील प्रवेशासाठी रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, जात पडताळणी दाखला अशा प्रकारची कागदपत्रे आवश्यकतेनुसार लागत आहेत. शहरात शिवाजी नगर गोडाऊनमध्ये नागरी सुविधा केंद्राचे काम सुरु आहे. या ठिकाणी खाजगी एजंटांचा वावर वाढला असून कागदपत्रांसाठी १५०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत मागणी होत आहे. त्यात चकरा मारणे वेगळेच आहे. याचा सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने नागरी सुविधा केंद्रामार्फत कागदपत्रे त्वरित मिळावी अशी मागणी मिशन फॉर आंबेडकर संघटनेने जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरामध्ये ११ परिमंडळामार्फत नागरी सुविधा केंद्र शिवाजीनगर गोडाऊनमध्ये अर्ज स्वीकारून दाखले देण्याचे काम चालू आहे. तसेच महा -सेवा केंद्र कार्यरत आहेत. परंतु काही वेळी कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे दाखले बाद केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेशासाठी अडचणी निर्माण होतात. अर्ज जमा केल्यानंतर १५ दिवसांनी दाखले मिळतात. त्यामध्ये शिवाजीनगर गोडावूनमध्ये एजंटाची वर्दळ वर्दळ वाढत आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी १२० रुपये आकारले जातात. रुपयांचा स्टॅम्प १० रुपये, १० रुपयांचा स्टॅम्प २० रुपये असा स्टॅम्पचा काळा बाजार चालू आहे. त्वरित दाखले मिळण्यासाठी मोठ्या रकमांची मागणी केली जात आहे.

महा- सेवा केंद्रामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. तोंडी कितीही किंमत सांगतात त्याची पोच पावती मिळत नाही. अर्ज दाखल केल्यानंतर पालकांना विद्यार्थ्यांना फक्त चकरा माराव्या लागतात. यासाठी सर्व परिमंडळ कार्यालयामध्ये महा- सेवा केंद्रामध्ये मनुष्यबळ जास्त ठेवावे. तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या नेमणूका करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय प्रवेशासाठी त्वरित दाखले देण्यात यावे आणि एजंटांवर कडक कारवाई करावी.

काही वेळी अधिकारी दाखले देण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे हा प्रकार वारंवार घडला तर मिशन ऑफ आंबेडकर या संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे Posted On: 15 June 2017