ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाडेतत्वावरील पीएमपीएमएल स्कूल बसच्या दरवाढीचा निर्णय चुकीचा - महापौर टिळक

पुणे, दि. १६ - शाळांना भाडे तत्वावर पुरवण्यात येणा-या बस भाडे दरात अडीच पट वाढ करण्याचा तुकाराम मुंढेंचा निर्णय चुकीचा असून या बाबत पीएमपीएमएल संचालक मंडळाशी चर्चा करण्याची आवश्यकता होती. परंतु चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द करून पुन्हा पहिल्या दराने शाळांना बस पुरवाव्यात असे, पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना दिले आहे.

पीएमपीएमएलकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष बस पुरवण्यात येतात. मागील वर्षात या बस सेवेसाठी प्रति कमी ६१ रुपये भाडे आकारण्यात येत होते. या भाड्यामध्ये पीएमपीएमएल प्रशासनाने अडीच पट  वाढ करत १४१ रुपये करण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. या संदर्भत दिवसांपूर्वी शाळांना पीएमपीएमएल प्रशासनाकडून कळवण्यात आले होते. मात्र, कमी कालावधी मिळाल्याने शाळांना पालकांना त्या प्रमाणात भाडेवाढीची माहिती देणे शक्य झाले नाही. त्यामुळे शाळांमध्ये बस पोहोचू शकल्या नाहीत. आणि त्याचा नाहक त्रास शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.

या संदर्भात महापालिकेच्या मुख्यसभेत सभासदांनी पीएमपीएमएल प्रशासनाच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ही भाडेवाढ त्वरीत रद्द करण्याची मागणी केली. मात्र, याबाबत पीएमपीएमएल प्रशासनाकडून माहिती देण्यासाठी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने महापौरांनी गटनेत्यांची बैठक बोलवून गट नेत्यांशी चर्चा करून भाडेवाढीचा घेण्यात आलेला निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने संचालक मंडळ समोर ठेवता परस्पर घेतल्याने हा निर्णय त्वरित रद्द करून शाळांची बस सेवा पूर्ववत करावी, असे पत्र मुंढे यांना दिले आहे.

या विषयावर शिवसेना गट नेते संजय भोसले यांनी करण्यात आलेली भाडेवाढ ही अवास्तव असून ती त्वरीत रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे महापौरांकडे केली आहे. यावर बोलताना भोसले म्हणाले शाळांना दिलेल्या बसेस अचानक बंद करण्यात आल्या आहेत. पीएमपीने याबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक होते. मात्र, तास करता थेट शाळांना भाडेवाढ करतोय असे सांगितले, परस्पर निर्णय करून शाळांना बसेस पाठवल्या नाहीत, भाडेवाढ बेकायदा असून संचालक मंडळाची परवागी घेण्यात अली नाही. त्यामुळे ही भाडे वाढ त्वरित रद्द करावी. 

याबाबत तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, दरवाढ नियमानुसार करण्यात आली आहे. महापालिका, शाळा किंवा पालकांनी १४१ रुपये प्रति किलोमीटर दर द्यावा आणि सेवा घ्यावी, असे मुंढे यांनी सांगितले. तसेच पीएमपीएमएलने अजून किती तोटा सहन करायचा, असा सवाल उपस्थित करित ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे.