ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फॉर्च्युनरमध्ये गँगरेप, शिंदवणे घाटात धक्कादायक प्रकार

पुणे, दि. १७ - सामूहिक बलात्काराने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. लिफ्टच्या बहाण्याने फॉर्च्युनर गाडीत दोघांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.  पुणे जिल्ह्यातील शिंदवणे घाटात ही घटना घडली आहे. उरुळी कांचनजेजुरी मार्गावर हवेली तालुक्यात शिंदवणे घाट आहे. या घाटात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेतील फॉर्च्युनर पिंपरी-चिंचवड परिसरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची असल्याचं सांगण्यात येत आहेही व्यक्ती कोण याचीच चर्चा पुणे परिसरात रंगली आहे. पीडित महिला केडगावची राहणारी आहे. ती नारायणपूरला देवदर्शनासाठी गेली होती. यावेळी घरी परतण्यासाठी रात्री उशीर झाल्याने पीडित महिला पारगाव चौफुला इथं उभी होती. त्याचवेळी एकटी असलेली महिला पाहून, फॉर्च्युनरमधून आलेल्या दोन तरुणांनी तिला लिफ्ट देण्याचा बहाणा केला. त्यानंतर फॉर्च्युनर थेट शिंदवणे घाटात नेवून तिथे दोघांनी बलात्कार केला आणि तिला घाटातच सोडून दिल्याचा आरोप आहे.

यानंतर संबंधित महिलेने घाटातूनच निघालेल्या दोन दुचाकीस्वारांच्या मदतीने फॉर्च्युनरचा नंबर मिळवून, लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलीस सध्या पुढील तपास करीत असून, फॉर्च्युनरवाला नेमका कोण हे लवकरच समोर येण्याची चिन्हं आहेत.