ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, झाडपडीच्या २५ घटना

पुणे, दि. १७ - पुणे शहर उपनगरात ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी (१६ जून) मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शहराच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पडला.  कर्वे रस्ता, डेक्कन, शिवाजीनगर, शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व पेठा, स्वारगेट, कात्रज, सातारा रस्ता परिसरासह अन्य भागांत कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस पडला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले होते तर काही रस्त्यावरून वाहत होते. यामुळे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.

कालच्या पावसानंतर शहरात झाडपडीच्या २५  घटना घडल्या. यामध्ये वडगाव शेरी, मुकूंद नगर , पत्र्यामारुती , दत्तवाडी , वडारवाडी , गुरूनानक नगर , गोखले नगर , बीजे मेडिकल होस्टेल , कल्याणी नगर , केशव नगर , नाना पेठ ,परिहार चौक या भागाचा समावेश आहे. तर काही भागात विजेच्या खांबावर झाड कोसळल्याने तारा तुटल्या होत्या. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

याशिवाय शहरातील शनिवार पेठ, कडबे आळी चंदननगर आदी परिसरातील काही घरात पाणी शिरल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.