ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

त्या महिलेवरील सामूहिक बलात्कार बनाव असल्याचे उघड

पुणे, दि. १९ - नारायणगाव येथून देवदर्शन करुन घरी परतणा-या महिलेवर शिंदवणे घाटाट दोन दिवसांपूर्वी फॉर्चुनर गाडीतून आलेल्या दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र, हा सगळा प्रकार वैयक्तित भांडणातून दोन तरुणांना केडगाव येथील महिलेच्या मदतीने तुरुंगात पाठविण्याचा असल्याचा समोर आला असून महिलेच्या मदतीने नारायणगव्हण येथील दोघांनी हा बनाव रचल्याचे समोर आले आहे

नारायणगव्हाण परिसरातील दादा गव्हाण संदीप जगदाळे या गुडांनी पूर्ववैमनस्यातून आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी केडगाव (ता. दौड) परिसरातील महिलेला हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. फॉर्च्युनर मोटारीतून आलेल्या दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याची साक्ष देणारे दोन तरुणही गव्हाण जगदाळे यांनी पैसे देऊन उभे केले असून संबंधित महिलेनेही गव्हाण जगदाळे यांच्या सांगण्यावरून खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली आहे.

घटनेनंतर संबंधित महिलेने गाडीचा नंबर पाहिलेले दोन साक्षीदारही उभे केले होते. त्यानंतर तपासासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलिसांच्या तपासानंतर हा कट प्रकाश चव्हाण अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी रचल्याचे निष्पन्न झाले आहे.