ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालखीच्या प्रसादाने इफ्तार

पुणे, दि. २० - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे रविवारी सायंकाळी शहरात आगमन झाले आणि सामाजिक सलोख्याचा एक अपूर्व सोहळा रंगला. माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या प्रसादाने मुस्लिम बांधवांनी उपवास (रोजा) सोडला. हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याचा हा सोहळा प्रत्येकाच्या मनात बंधूभाव निर्माण करणारा होता.
नाना पेठ येथील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे ३२ वर्षांपासून हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. कार्यक्रमाला मुस्लिम धर्माचे अभ्यासक, विविध धर्मगुरू यांच्यासह बौद्ध धर्माचे प्रचारक जयसिंगराव कांबळे, शिख धर्माचे मोकासिंग अरोरो, मुस्लिम धर्माचे इकबाल शेख, सत्तारभाई Posted On: 20 June 2017