ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभारणारी पुणे महापालिका ठरली देशात पहिली

पुणे, दि. २० - पुणे महापालिकेच्या २४x पाणी पुरवठा योजनेसाठी हजार २६४ कोटींचे कर्जरोखे पुढील पाच वर्षात  उभारण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्यातील २०० कोटीचे कर्जरोखे स्वरुपातील पैसे महापालिकेच्या तिजोरीत उद्या जमा होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहेयाबाबत केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी ट्विट करून महापालिकेचे अभिनंदन केले आहे. २२ जूनला नायडू यांच्या उपस्थितीत या कर्ज रोख्याची नोंदणी मुंबई शेअर बाजारात करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी राज्य आणि केंद्र सरकारने निधी देण्यासाठी असमर्थता दर्शवल्यामुळे या प्रकल्पासाठी हजार २६४ कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला असून कर्ज रोखे उभारण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात हे कर्ज रोखे उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्यातील २०० कोटीच्या कर्ज रोखे उभारण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. 

महापालिकेला कर्ज रोखे तयार करण्यासाठी २१ कंपन्यांनी तयारी दर्शवली होती. त्यातील कंपन्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येकी १०० कोटी प्रमाणे उद्या महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी जमा होणार आहेत. यामुळे २४ तास पाणी पुरवठा योजनेला चालना मिळणार आहे. २२ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरसिकास मंत्री वैंकय्या नायडू, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या कर्ज रोख्याची मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात येणार आहे. २००७ नंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली असून याबद्दल केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी अभिनंदन केले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या २४ तास समान पाणीपुरवठ्यासाठी हजार २६४ कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय नुकताच पुणे महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. महापालिकेच्या वतीने सोमवारी २०० कोटींचे कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात आणण्यात आले. ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रमुख बँका, विमा कंपन्या, पेन्शन फंड संस्था अशा २१ जणांनी या कर्जरोख्यांसाठी बोली लावत सहा पट ज्यादा गुंतवणुकीची तयारी दर्शविली. त्यापैकी .५९ टक्के असा सर्वाधिक कमी व्याजदर आकारणार्या वित्तीय Posted On: 20 June 2017