ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दलित व्यक्ती उच्च पदावर जातोय, विरोधकांनी उमेदवार देऊ नये - रामदास आठवले

पुणे, दि. २० - भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिल्याने दलित समाजाच्या व्यक्तीला पुन्हा एकदा सर्वोच्च पदावर जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवार उभा करू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना आठवले म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दलित व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्ष दलितांच्या आणि आरक्षणाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा निर्णय क्रांतिकारक असून  यामुळे भाजप सरकार दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्कर्षासाठी भूमिका मांडत असल्याचे सिद्ध झाले आहे.

विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिल्याने विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. विरोधकांना भलत्याच नावाची अपेक्षा होती. जेणेकरून त्यांना सरकारला विरोध करण्याची संधी मिळाली असती. परंतु प्रत्यक्षात घडले भलतेच. त्यामुळे विरोधकांनी आता राष्ट्रपती पदासाठी उमेदवार देता कोविंद यांना पाठिंबा द्यावा.